मला भावलेलं रत्नागिरीतलं एक अप्रतिम ठीकाण “आरेवारे बीच रिसॉर्ट”
कोकणातील एका युवा इंजिनियरने इलेक्ट्रिसीटी नसताना सौर यंत्रणेवर चालवलेला अप्रतिम होमस्टे…
थांयलडमधल्या पुकेट समुद्रकिनाऱ्यापेक्षाही रत्नागिरी व गणपतीपुळेच्या दरम्यान आरेवारे समुद्रकिनारा कोकणाच्या सौंदर्याचा मानबिंदु आणि एक अप्रतिम पर्यटन परिसर. तसेच या पर्यटनाचा केंद्रबिंदु म्हणुन प्रसन्न मयेकर यांचा आरेवारे बीच रिसॉर्ट. 360° मध्ये पसरलेला, पांढऱ्याशुभ्र वाळुचा, सलग सुंदर समुद्र किनारा, स्वच्छ निळेशार पाणी आणि निरव शांतता अशा या परिसरातील अप्रतिम होमस्टे. निसर्गाच्या अतिउच्च सौंदर्यबिंदुला कधी संधी मिळाली तर, प्रसन्न मयेकरच्या या देखण्या होमस्टेला अवश्य भेट द्या.
केवळ शासनाच्या मागे लागण्यापेक्षा व चर्चेपेक्षा पर्यटन व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या तरुणांनी एकदातरी अवश्य भेट दया. इलेक्ट्रिसीटी नसताना सौर यंत्रणेवर उभारलेला कोकणातला प्रसन्न मयेकरचा प्रकल्प हा तरुणांमध्ये पर्यटनांचा आत्मविश्वास निर्माण करु शकतो. इतकी प्रंचड ऊर्जा प्रसन्न मयेकरच्या आरेवारे बीच रिसॉर्टमध्ये आहे.
भेटीसाठी प्रसन्न मयेकर मो. नं – ९९२३५६००४० यांना अवश्य भेट द्या.
वेबसाईट – http://www.aarewarebeachresort.com/
किशोर धारिया
(हिरवळ प्रतष्ठान)